तालुक्यात सोसायटी वर वर्चस्व ठेवण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

सध्या नवीन वर्षाच्या सुरुवाती पासून ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूका धुमधडाक्याने संपन्न होत आहे. यातील अनेक सोसायट्या अविरोध झाल्या.
काही मोजके अपवाद वगळता बहुतांश सोसायटी वर वर्चस्व ठेवण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी होत आहे.
राळेगांव तालुकयामध्ये अंशी टक्के सोसायटी वर काँग्रेस चा वरचष्मा होता.आणि या वेळी सुद्धा तेच राजकीय बलाबल राहील असेच संकेत सध्या तरी दिसत आहेत.
प्रमुख तुल्यबळ भाजपा पक्ष आहे.पण स्थानिक स्वराज्य संस्था,नगर पंचायत राळेगांव,विधानसभा निवडणूका व्यतिरिक्त भाजपा ला सहकार क्षेत्रात “इंटरेस्ट” नसल्याचे या दरम्यान निदर्शनास आले आहे. गावपातळीवर कार्यकर्ता मंडळी ना प्रत्येक निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात पण गावपुढारी व वरिष्ठ नेते अविरोध निवडी साठीच आग्रही असतात. कारण खिसा खाली होत नाही,सोबत आपल्या च माणसांची वर्णी लावता येते.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक निवडीसाठी व कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव साठी सोसायटी वर ताबा असणं आवश्यक आहे.
सहकार क्षेत्रात काँग्रेस पक्ष अंशी टक्के तर इतर सर्व राजकीय पक्ष वीस टक्के असे च समीकरण होते आणि आता पाच वर्षां साठी राहील.
ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या निवडणूकी साठी तर भाजपाला फक्त दोन च उमेदवार मिळाले. सर्व विरोधक मिळून अकरा उमेदवारां ची जुळवाजुळव कशी तरी झाली.आणि आणखी काही उमेदवार निवडणूक रिंगणातून नामांकन पत्र मागे घेतील अशी च चर्चा संपूर्ण शहरात सुरु आहे. राळेगांव तालुक्यात
छेचाळीस सोसायटी असून, सर्व निवडणूका जून महिन्यात पूर्ण होईल.
सर्व नवनिर्वाचित संचालक सहकार क्षेत्रातील महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव साठी मतदार यादी मध्ये समाविष्ट होईल. काँग्रेस पक्षाचे सर आणि भाऊ मध्ये एकवाक्यता झाल्याने नगर पंचायत राळेगांव मध्ये अभूतपूर्व यश मिळाले आणि आता बहुतांश सोसायटी वर वर्चस्व ठेवण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी होत आहे.