
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी मंत्री वसंतरावजी पुरके
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लोकसह्भागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत तयार करण्यात आलेल्या दापोरी येथील सामुहिक माहिती केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष वसंतराव जी पुरके सर यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सदस्या उषाताई भोयर ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा भगत, उपसरपंच तथा उक्तर्ष गाव विकास समिती चिकना चे अध्यक्ष नारायणरावजी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य महादेव गेडाम ललिता नागोसे अध्यक्ष नवनिर्माण संयुक्त महिला समिती चिकना , सिमा तोडासे अध्यक्ष राणी दुर्गावती संयुक्त महिला समिती यांच्या उपस्थितीत करण्यात आला हा कार्यक्रम राळेंगाव तालुक्यातील लोहारा, एकलारा, कृष्णापूर, श्रीरामपूर, शिवरा, मांडवा, पिंपरी दुर्ग, सोयटी, कोपरी, इंझापूर वालधुर, चिकना व दापोरी अशा एकूण 13 गावांची निवड केली असून, प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरावर गाव विकास समिती व महिला समितीच्या माध्यमातून
या समितीच्या माध्यमातून उपजिवीका उपक्रम राबविले जाणार आहे त्यात सेंद्रिय शेती पध्दत, अल्प खर्चिक पध्दत, फळबाग लागवड, खरिप व रब्बी मध्ये कापूस, तुर व सोयाबीन चे व गहू व हरभरा चे डेमो प्लाँट सेंद्रिय शेती च्या माध्यमातून तयार झालेल्या मालाचे मार्केटींग तसेच दुग्धव्यवसाय, शेळीपालन व्यवसाय, बोकड पालन व्यवसाय, कू्षी औजार बँका स्थापन करणे वन उपज ,मत्स्यपालन व्यवसाय डिजिटलायझेशन सेवेच्या माध्यमातून शासकीय योजनाचा लाभ, अभ्यास दौरा, कृषी आधारित व्यवसायावर डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण, लहान उद्योजकांना आर्थिक सहाय्य , जनावरांनसाठी पाणी पिण्याच्या टाके इत्यादी वेगवेगळे उपक्रम यात राबविण्यात येणार आहे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकल्पाच्या सामुहिक माहिती केंद्राचा उद्देश याबाबतची माहिती प्रकल्प समन्वयक प्रशांत धनोकार यांनी दिली जिल्हा परिषदेच्या सदस्य उषाताई भोयर यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले उपसरपंच नारायणराव भोयर यांनी प्रकल्प समितीच्या माध्यमातून कसा पुढे जात आहे आणि गावातील लोकांचा कसा विकास करता येईल यावर मत व्यक्त केले शेवटी अध्यक्षीय भाषणात पुरके सरांनी संस्था च्या माध्यमातून आतापर्यंत तालुक्यातील गावांचा कसा विकास झाला आणि लोक सहभागातून काय साध्य होऊ शकते हे विषद करून सांगितले ,शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि त्यातून शेती चा विकास कसा साधता येईल यावर मार्गदर्शन केले सामुहिक माहिती केंद्रातुन शेती आवश्यक बाबतीत लोकांनी लाभ करून घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राळेगाव तालुका समन्वयक बालाजी कदम यांनी केले यांनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलासा संस्थेचे कार्यकर्ते पुरूषोत्तम राठोड, शितल ठाकरे प्रशांत पाटील शितल सलाम कू्षीमित्र, पुनम इंगोले पशुसखी ,गाव विकास समिती व संयुक्त महिला समितीच्या सदस्यांनी यांनी मदत केली. कार्यक्रमाला दापोरी, चिकना व कळमनेर येथील नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.
