स्मशानभूमीला रस्ता नसल्याच्या बातमीची दखल घेत तहसीलदारांनी केली पहाणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी चिखली येथील स्मशानभूमीला रस्ता नसल्याची बातमी प्रसिद्ध होताच चिखली येथे जावून स्मशानभूमीच्या रस्त्याची पाहणी केली.
चिखली येथील स्मशानभूमीच्या जागेत बऱ्याच वर्षांपासून शेडचे बांधकाम करण्यात आले परंतु तिथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने बऱ्याच वर्षांपासून स्मशानभूमी वापराविना पडून होती हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्याच्या संदर्भात वारंवार सांगून सुद्धा रस्ता उपलब्ध होत नव्हता त्या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे यांनी बातमीची दखल घेत दिं २८ एप्रिल २०२२ रोज गुरुवारला चिखली येथे स्मशानभूमीच्या रस्त्याची पाहणी केली असता यावेळी तहसीलदार कानडजे यांनी स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंडळ अधिकारी शिशिर निनावे, तलाठी वृषाली भोयर मॅडम तसेच गावचे सरपंच सौ नलू वैरागडे, सदस्य सुरेंद्र भटकर,पोलीस पाटील सौ.कांचन घायवटे,अंगणवाडी सेविका सौ.शेशिकला फुलमाळी, अभय कुंभारे, रुपराव डफ, अनुप भोंगाडे,आदी गावातील नागरिक उपस्थित होते.