
पालकमंत्री मा.श्री संदीपजी भुमरे साहेब तसेस यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा.भावनाताई गवळी व खासदार बाळूभाऊ धानोरकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दि १ /१०/२०२१ रोजी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री संदीपजी भुमरे साहेब तसेस यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा.भावनाताई गवळी व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना ग्रामपंचायत च्या पथदिव्याचे बिल १५ व्या वित्त आयोगातून न भरता महाराष्ट्र शासनाने स्वतः भरावे २) ग्रामपंचायतचे १५ व्या वित्त आयोगाचे नवीन बचत खाते ICICI बँकेत न उघडता सद्या स्थितीत असलेल्या तालुक्याच्या बँकेत कायम असावे जेणे करून व्यवहार करण्यास कोणत्याही अडचणी येणार नाही व सदर शासन निर्णय रद्द करावा. ३ ) प्रधानमंत्री आवास योजना पत्रक ( ड ) मधील आपत्र ठरलेल्या गरजू लाभार्थ्यांना पात्र ठरवून लाभ मिळण्या बाबत .अश्या ग्रामपंचायतिच्या विविध समस्यांचे निराकरण करणे बाबत सरपंच संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी राळेगाव तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष मा.अंकुश भाऊ मुनेश्वर ,सचिव राजेंद्र भाऊ तेलंगे,सरपंच किशोर भाऊ धामंदे ,सरपंच सुधीरभाऊ जवादे,प्रकाश भाऊ पोपट,सरपंच प्रसाद ठाकरे ,विशाल येनोरकर,सरपंच मोहन नरडवार ,सरपंच अजय पिंपरे,राहुल वाघ,आनंद सोळंके,पदमाकर ठाकरे,निश्चल ठाकरे,दिनेश वानखेडे,गौरव मडावी,सुनील आडे,निलेश सोनटक्के आदी यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.
