
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव :– दोन आठवड्यापूर्वी राळेगाव तालुक्यातील अनेक गावांत पूर परिस्थिती उद्भवली होती,अनेक घरे आजही प्रभावित आहेत,आज सकाळी संकल्प फाउंडेशन च्या वतीने व यवतमाळ कर जनतेच्या सहभागाने राळेगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देऊन जीवनावश्यक वस्तूंची किट प्रत्येक कुटुंबाला देण्यात आली,सकाळी ठीक 8 वाजता जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री ललित कुमार वऱ्हाडे ह्यांच्या शुभेच्छासह व सर्व संस्था संघटनांचे समन्वयक श्री घन:श्याम दरणे,सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्तिमत्व श्री सुरेश राठी ह्यांच्या उपस्थितीत संकल्प फाउंडेशन, संकल्प वनिता वाहिनी, संकल्प आपुलकी च्या 20 जणांची चमू राळेगाव साठी रवाना झाली,राळेगाव तहसील चे तहसीलदार रवींद्र कानडजे, नायब तहसीलदार श्री बदकी साहेब, मंडळ अधिकारी,निनावे तलाठी महिंन्द्रेकर म्याडम,कृषी सहाय्यक,स्थानिक गावातील सरपंच ह्या प्रशासनिक अधिकारी ,लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांच्या सोबत तालुक्यातील सावंगी (पे) येथील 68 पूरग्रस्तांना,एकबुर्जी येथील 31,कोपरी येथील 19,रोहिणी येथील 26 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक किराणा।किट चे वितरण।ह्यावेळी करण्यात आले,ह्या मोहिमेसाठी संकल्प फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष प्रलय टिप्रमवार, सरचिटणीस वसंत शेळके, संयोजक गजेंद्र उन्हाळे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य,रवी ठाकूर,आशिष महल्ले,मनोज तामगाडगे,राजेंद्र गावंडे,वीरेंद्र कलोसिया,अशोक पलंगे,रवी कडू,शहराध्यक्ष विनोद दोंदल,आकाश भारती, शुभम वानखडे,अक्षय हांडे,अनिकेत गोपाळे,संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख,अंजली फेंडर,संगीता टिप्रमवार, वर्षा गावंडे,पूनम।शेंडे,स्नेहल रेचे ह्यांनी योगदान दिले..
