विदर्भ पटवारी संघटना जिल्हा यवतमाळ कडून सत्कार समारंभ साजरा

. ढाणकी:-(प्रतिनिधी- प्रवीण जोशी )

शनिवार दिनांक:-२३जून २०२२ रोजी विदर्भ पटवारी संघटना शाखा,उमरखेड च्या वतिने ८३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमाच्या निमित्याने उमरखेड तहसिल अंतर्गत तथा परीसरातील समस्त पटवारी बांधव उपस्थीत होते.सर्व पटवारी बांधवाच्या समस्या/संघटत्नात्मक जबाबदारीचे भान ठेऊन सर्वांनी आप-आपल्या विभागासाठी सदैव कार्यतत्पर राहावे असे अवाहन करण्यात आले.विदर्भ पटवारी संघाच्या ८३ व्या वर्धापन दिना निमित्त माजी समस्त सेवानिव्रत्त तलाठी बांधवांचा ह्रुद्यपुर्वक सत्कार करण्यात आला.त्यामध्ये प्रामुख्याने उमरखेड तहसिल अंर्तगत ढाणकीचे सेवानिवृत्त कर्तव्यदक्ष तलाठी नारायण देविदास येल्हेकर यांची संपूर्ण सेवा सर्व तलाठी बांधवांसाठी प्रेरणादायीअशी झाली वयाच्या 81 व्या वर्षी सुद्धा अत्यंत कुशलतेने प्रत्येक शेतकरी बांधवांची पोट तिडकीने प्रश्न सोडवितात आणि योग्य ते मार्गदर्शन करून शेती विषयक वाद अत्यंत कुशलतेने सोडवण्याचा त्यांचा हातखंडा आहे शेती मोजणे भाऊबंदकीचे शेतीविषयक हिस्से पाडणे कार्यालयीन दप्तर गावनमुना १ते २९पर्यंत सर्व दप्तराचे अद्यावत ज्ञान ठेवणारे ,नारायण देविदास येल्हेकर यांचा हृदयपूर्वक सत्कार याप्रसंगी घेण्यात आला .ह्याबद्दल आयोजक तथा सर्व विदर्भ पटवारी संघ शाखा उमरखेड चे आभार व्यक्त करण्यात आला.