आठवडी बाजाराच्या ओठ्याचा उपयोग किरायासाठी

वरोरा :- चिकणी या गावाच्या आजूबाजूस छोटे मोठे अनेक विक्रेते आहे. या गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरतो यासाठी शासनाद्वारे येथे दुकानदाराकरिता लाखो रुपये खर्चून ओटे बांधण्यात आले. मात्र या ओट्याचा उपयोग होत नसल्याने आजूबाजूला मोठया प्रमाणात कचरा, घाण, झाली आहे प्रशासकीय अधिकारी सरपंच याचा दुर्लक्षिपणामुळे गावाचा विकास खुंटला चा दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामीण भागात नागरी, चिकणी, माढेळी, टेमुर्डा बाजारपेटेकरिता मुख्य गावे असून येथे मोठ्या प्रमाणत आठवडी बाजार भरत असतो या गावाला शेगाव, वरोरा, टेमुर्डा, हिंगणघाट येथील व्यापारी आपला व्यापार करण्यासाठी येथे येत असतात. शासन स्तरावर व्यापारी वर्गाचा मूलभूत गरजा ओळखून बाजार ओटे बांधण्यात येतात परंतु चिकणी हे गाव यास अपवाद ठरत आहे. या गावातील ओटे किमान 5 वर्षापूर्वी बांधण्यात आले. यासाठी शासनाद्वारे 12 ते 14 लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. मात्र आता हे ओटे फक्त शोभेची वस्तू बनवून आहे. या परिसरात संडास बाथरूम याची व्यवस्था ग्रामपंचायत विभागाद्वारे करण्यात आली नसल्याची ओरड व्यापारी वर्ग करीत आहे. त्यामुळे ओटे असूनही येथे कोणतांही बाजार भरत नसल्याने शासनाच्या लाखो रुपयाचा निधीवर पाणी फिरले आहे. तेव्हा प्रशासन स्तरावर त्वरित कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला या ओट्याचा उपयोग बाजारासाठी करावा असा आदेश द्यावा. जेणेकरून शासनाच्या महसुलात वाढ होईल.