राळेगाव येथे जंगी शंकरपटाचे आयोजन

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगांव येथील शिव लाखीया लेआऊट रावेरी रोड राळेगांव येथे २४ ते २६ मार्च दरम्यान जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या पटात ३ लाख ११ हजार बक्षिसांची जंगी लुट करण्यात येणार आहे. जनरल गटासाठी १५०१ रुपये प्रवेश फी असुन, क गटासाठी १००१ प्रवेश फी राहणार आहे. चित्तरंजनदादा कोल्हे भाजपा तालुकाध्यक्ष राळेगांव, प्रशांत तायडे सभापती पं.स.राळेगांव, संजय काकडे अध्यक्ष अहिल्याबाई काकडे बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ किन्ही डॉ. कुणाल भोयर भाजप शहर अध्यक्ष राळेगांव यांच्या प्रयत्नातून हा शंकर पट होत आहे. पटात पहिल्या येणाऱ्या बैलजोडीला २१ हजार, द्वितीय ११ हजार, तृतीय ९ हजार, चतुर्थ ८ हजार, पाचवे बक्षिस ७ हजार अशी १३ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलजोडीच्या मालकांसाठी नियम व अटी लागु करण्यात आलेल्या आहे. अशी माहीती आयोजकां तर्फे कळविण्यात आलेली आहे.