सोसायटीच्या अध्यक्षपदी सचिनजी हूरकुंडे व उपाध्यक्ष पदी राजेशजी काळे यांची बिनविरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या अध्यक्ष पदी सचिनजी हूरकुंडे व उपाध्यक्ष पदी राजेशजी काळे यांची अविरोध निवड झाली आहे..
राळेगांव ची सोसायटी गेल्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे ताब्यात असून यावेळी सर्व तेरा ही संचालक मोठ्या मताधिक्यांनी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहे.
आज पार पडलेल्या निवडीत काँग्रेस पक्षाचे सर आणि भाऊ यांनी ही निवड करुन सर्वांना च बूचकाळ्यात टाकून
तत्कालीन अध्यक्ष स्व पांडुरंग हूरकुंडे यांचे पक्ष निष्ठेची, सोसायटी स भरभराटीस नेणाऱ्या स्व.पांडुरंगभाऊ च्या चिरंजीवास थेट अध्यक्ष पदी बसवून विनम्र श्रद्धांजली दिल्याची प्रतिक्रिया चर्चेअंती ऐकावयास मिळाली आहे हे विशेष.
यावेळी नवनिर्वाचित संचालक जानराव गीरी,कृष्णराव राऊळकर, प्रभाकर राऊत,विनायक नगराळे,गजानन पाल,नितीन महाजन, सौ.विभाताई गांधी,सौ.ज्योतीताई डाखोरे,विनोद नरड, तातेश्वर पीसे,अशोक पिंपरे व सचिव पी.एन.सोयाम सह अन्य मान्यवर उपस्थित होते.