1

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव केद्र वाढोणा बाजार येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.नामदेव मांडवकर , पिंपळगाव चे सरपंच श्री.किशोरभाऊ धामंदे , पिंपळगाव चे सामाजिक कार्यकर्ते श्री. निलेश भाऊ गुजरकर, समिती चे सदस्य व पालक वर्ग तसेच दाखल पात्र विद्यार्थ्याचे पालक उपस्थित होते. मेळाव्याचे सुत्र संचालन श्री. समीर दौलतकर सर ,प्रास्ताविक मुख्याध्यापक कु. अर्चना डोळस मॅडम तर आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका सौ. कल्पना ताई महाकुलकर यांनी केले. दाखल पात्र विद्यार्थ्यानी प्रत्येक खेळात सहभाग नोंदविला पालकांनी त्यांना मिळालेल्या पुस्तिके व्दोरे मुंलाची प्रगती कशी करता येईल हे समजून घेतले.पालकानी मेळाव्याचा खुप आनंद घेतला. मुलांना खाऊ वाटप करुन मेळाव्याची सांगता करण्यात आली.
