परिवर्तन पॅनलला निवडून देणे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक श्रावनसिंगजी वडते

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्हा खाजगी पतसंस्था 147 च्या होऊ घातलेल्या येत्या 10/7/2022 च्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीत सत्ताधारी सहकार पॅनलच्या विरूद्ध परिवर्तन पॅनल अशी एकास एक अशी लढाई होणार असून गेल्या विस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांना सभासदांच्या समस्या समजून घेतल्या नसून पतसंस्थेचे अनेक वर्षांपासून संगणीकरण झाले नसून संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून सभासदांना सन्मानाची वागणूक मिळत नसून या संस्थेत मनमोकळेपणाने मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याने हे कुठेतरी थांबायला पाहिजे सोबतच ही संस्था कुणाची खाजगी मालमत्ता नसून ही शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संस्था आहे याची जाणीव सत्ताधाऱ्यांना व्हावी म्हणून या निवडणुकीत जिल्ह्यातील पंधरा संघटना एकत्र येऊन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढणार असून आता ही अस्तित्त्वाची लढाई असून ,// अभी नही तो कभी नहीं // उठ सभासद जागा हो,परिवर्तनाचा धागा हो //अशा प्रकारचा नारा देत असून ही लढाई सत्ताधारी सहकार पॅनलला सोपी नसून या वेळी परिवर्तन होणार असून जिल्ह्यातील शाळांना भेटी दिल्यानंतर मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, सत्ताधाऱ्यांचा असणारा रोष हा नक्कीच परिवर्तन पॅनलला विजयाकडे वाटचाल करण्यासाठी सहकार्य करणारा असून या निवडणुकीत राळेगाव कळंब सर्वसाधारण मतदार संघातून परिवर्तन पॅनल तर्फे लखाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय झाडगावचे प्राध्यापक श्री रंजू चौधरी व गाडगे महाराज विद्यालय अंतरगावच्या कु.दुर्गा पेंदोर मॅडम आपले नशीब आजमावत असून या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या पंधराही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे श्रावनसिंगजी वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.