कृषी विभाग बंद प्रकरण तापले, मनसे द्वारे कारवाई ची मागणी , तहसीलदार यांना दिले निवेदन

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कृषी विभागाची गय करणार नाही
मनसे चा इशारा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ऐन हंगामात कृषी कार्यालय बंद ठेवुन शेतकऱ्यांची थट्टा कgरणाऱ्या तालुका कृषी विभागावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा मनसेने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राळेगाव तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. हा गोरगरीब, आदिवासी शेतकरी, कष्ट्करी जनतेचा तालुका आहे. पेरणीची वेळ तोंडावर आली असतांना आपला कृषी विभाग मात्र निद्रिस्थ वा झोपेचे सोंग घेऊन पहुडलेला असल्याची स्थिती निदर्शनास येते. दिनांक 31में 2022 रोजी मनसेच्यावतीने राळेगाव तालुक्यात परवानगी नसलेले बियाणे, रासायनिक खते, औषधे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करा या विषयाचे निवेदन देण्याकरिता गेले असता कृषी कार्यालयात शुकशुकाट होता एकही कर्मचारी तिथे हजर नव्हता.
बियाणे बोगस निघाले तर पूर्ण हंगाम वाया जातो. ती वेळ पुन्हा जुळून येतं नाही. मा. जिल्हाधिकारी यांनी बोगस बियाणे विक्री बाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असतांना याची जबाबदारी असणाऱ्या कृषी विभागाची अनास्था संताप आणणारी आहे. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी मनसे पर्यंत येत असतांना , जेव्हा या विभागाची शेतकऱ्यांना खरी गरज आहे त्यावेळी जर अधिकारी, कर्मचारी कार्यालयात नसतील तर हा पांढरा हत्ती शासन का पोसते. असा प्रश्न निर्माण होतो. ही खुपच संतापजनक बाब आहे मनसे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले असता तिथे कोणीच नसल्याने मनसेच्या वतीने तालुका कृषी कार्यालयाच्या दरवाज्याला निवेदन चिटकवून दरवाजाला हार घालून दिला.

त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी यांनी 31 तारखेला वडकी ला कृषी विभागाची सभा घेत होतो असा खोटेपणा करायचा प्रयत्न करून परत स्वतः केलेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. या तालुक्यातील शेतकऱ्यांची हि शुद्ध फसवणूक आहे आणि जर कृषी विभाग बैठक घेत असेल तर कृषी केंद्रात बैठक घ्यायची कोणती गरज आहे
जे कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे अशा तक्रारी येत आहे .त्यांच्याच कृषी केंद्रात जाऊन कृषी अधिकारी बैठक घेवुन स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालत असुन हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही असा संतप्त ईशारा मनसेने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कामं करणारा कृषी विभागच जर शेतकर्यांची फसवणूक करीत असेल तर शेतकरी हितासाठी सर्वक्षेत्रीय अधिकारी या नात्याने तहसिलदार यांनी याप्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी व तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा मनसेच्या वतीने शेतकरी हितासाठी जनआंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, यांनी दिला आहे.
यावेळी मनसे शहरं अध्यक्ष प्रतिक खिरटकर, जगदीश गोबाडे, गिरीश कुंभलकर, अनिल वाढई, धिरज गाऊत्रे, लोकेश मोहुर्ले, शईबाझ शेख, एस के पटेल आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.