
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी क्लस्टर अंतर्गत येणाऱ्या रिधोरा परिसरासह इतरही गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानाच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा महिलांमध्ये होत आहे. देशोन्नतीने एकदा नव्हे तर दोनदा याविषयी वृत्त प्रकाशित करून सुध्दा सबंधित अधिकारी या गंभीर गैरप्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामूळे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान राबविणारे जिल्हास्तरीय अधिकारी व तालुका अभियान राबविणारे अधिकारी दोघेही मिळुन ग्रामीण भागातील महिलांची लुट तर करत नाही ना ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. महिला सक्षमीकरण क्षमता बांधणी अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप आहे. देशोन्नतीने दोनदा या गैप्रकारविषयी वृत्त प्रकाशित केले ; परंतु या वृत्ताची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल न घेता त्यांनी त्या अधिकाऱ्यांना पाठिशी घातल्याचे दिसत आहे. मधुमक्षिका पालण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी या अभियानांतर्गत तालुक्यासाठी आला होता . परंतु हा निधी महिला सक्षमीकरण क्षमता बांधणी अधिकारी राळेगाव यांच्या सहकार्याने बाहेरच्या बाहेर वळवून हडप करण्यात आला हे स्पष्टपणे दिसून येत आहे . तालुका क्षमता बांधणी अधिकारी यांनी पाहिजे तसे महिलांना मार्गदर्शन न करणे व महिलांनी आपल्या गावामध्ये ग्रामसंघामार्फत एकदा ठराव मंजूर करून घेतला तर त्यांना विरोध करणे असे या अधिकाऱ्याचे काम सुरू आहे. जीथे या अधिकाऱ्याचा फायदा होईल त्या ठरावाला मंजुरात देणे असे या अधिकाऱ्याचे काम सुरू आहे. या महिला सक्षमीकरण क्षमता बांधणी अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू पणामुळे रिधोरा परिसर व इतरही गावामध्ये महिला बचत गट बंद पडण्याच्या मार्गावर आहे . बऱ्याच गावचे महिला बचत गट बंद पडले आहे तर महिलांना दिलेल्या कर्जाची परतफेड आली नाही . ग्रामसंघाच्या व प्रभाग संघाच्या नावावर उभारलेले व्यवसाय सुध्दा बंद पडल्याचे दिसून येत आहे.तरी सुध्दा हा अधिकारी उंटावर बसून शेळ्या हाकतांना दिसत आहे. उमेदच्या नावावर महिन्याला हजारो रुपयांचा पगार घेऊन ते आपल्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवित आहे . या परिसरातीलतील महिला सक्षमीकरण झाले आहे असे सांगून वेळ मारून नेत असल्याचे दिसून येत आहे. पण महिलांच्या सागण्या वरुन खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले आहे का ? सदर या अधिकाऱ्याचे काम तालुक्यात गावोगावी जावून महिला बचत गटांना मार्गदर्शन करणे व एखादा गट बंद पडला असेल तर हा गट कोणत्या कारणांमुळे बंद पडला आहे , याची माहिती घेऊन परत तो गट सुरू करणे , वेळेवर महिलांना कर्ज वाटप करून त्यांच्या कडून वेळेवर परतफेड करून घेणे , महिन्याला एक दिवस जावून त्यांची मिटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे असे या क्षमता बांधणी अधिकाऱ्याचे काम आहे ; परंतु हा अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी बसून काम पाहत आहे. या अधिकाऱ्याना कुणाचे पाठबळ आहे ? असा प्रश्न केला जात आहे. जिल्हाधिकारी यांनी कसून चौकशी केल्यास हा लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही . महिला सक्षमीकरण क्षमता बांधणी अधिकारी यांचा मनमानी कारभार असल्याने राळेगाव तालुक्यातील वडकी क्लष्टरमधील रिधोरा परिसरासह इतरही गावामध्ये महिला बचत गट बंद पडण्याच्या मार्गावर !
जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान राबविण्यात येत असलेल्या कामाची चौकशी करून ग्रामीण भागातील महिलांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी महिलांकडून होत आहे .
