
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मराठी वृत्तपत्राचे जनक विष्णुशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. याचेच औचित्य साधून ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज बरडगाव च्या वतीने राळेगाव पत्रकार संघाच्या प्रतिनिधीचे सत्कार सोहळ्याचे आयोजन दि. 7/01/2025 रोजी करण्यात आले. पत्रकारितेचे महत्व हे समाजातील अनन्यसाधारण मानल्या जाते म्हणूनच पत्रकारिता हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून समाजातील तळागळा पर्यंत माहिती पुरवून समजजागृती घडविण्याचे काम करतात. समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून घडत असते म्हणूनच पत्रकार दिना निमित्य विद्यार्थ्यांना पत्रकारांचे महत्व, कार्य यांचे मार्गदर्शन घडवून राळेगाव पत्रकार संघातील प्रतिनिधीचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यात राळेगाव पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री. प्रकाशजी मेहता, श्री. अशोकजी पिंपरे, श्री. मोहनजी देशमुख, श्री. मंगेशजी राऊत, श्री. मनोहर बोभाटे, श्री. रामूजी भोयर, श्री. महेश शेंडे, श्री. राजेशजी काळे, श्री. राष्ट्रपाल भोंगडे, श्री गुडू मेहता, श्री. महेश भोयर, श्री. विनोदजी चिरडे, श्री. राजनारायणजी सहदेव, सौं. संतोषी वर्मा, श्री. गजानन अक्कलवार, श्री. कैलासचंद्र वर्मा आदी सर्व पत्रकार प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शीतल बल्लेवार, संस्थेचे सचिव तथा राळेगाव नगर पंचायत चे नगरसेवक डॉ. संतोष कोकुलवार, संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य श्री. मोहन देशमुख, राळेगाव तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री. प्रकाश मेहता, संस्थेचे मार्गदर्शक श्री. धनंजय शेगेकर यांच्या उपस्थितीत सर्व पत्रकार प्रतिनिधिचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन शाळेचे शिक्षक श्री. आशिष कडू यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील व्यवस्थापक श्री. साईनाथ बल्लेवार, शिक्षक श्री. अरविंद बटाले, श्री. मनोज भगत, श्री. चटलेवाड, श्री. यश ठाकरे, सौं. मनीषा काळे, कु. नीता भोयर, सौं. मनीषा धोटे, सौं. शुभांगी केवटे, सौं. वैशाली बंड्डेवार आदींचे सहकार्य लाभले.
