
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
पावसाळ्यात रोहणी येथील जनतेला आणि धानोरा येथील शेतकऱ्याना होतो भयानक त्रास,
वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज
धानोरा या गावालगत मोठा नाला वाहत असतो त्या नाल्यावर काहि दिवसा अगोदर रपट्याचे बांधकाम करण्यात आले ,त्या रपटयावरून रोहणी या गावातील लोकांना नेहमी ये जा करावी लागत असते, मात्र पावसाळ्यात या नाल्याला भरपुर पाणि असल्याने रोहणी व धानोऱ्यातील जनतेला तासो नं तास पाणी उतरण्याची वाट पाहावी लागते ,धानोरा येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत हे रोहणी शिवारात आहे त्यामुळे शेतकरी सकाळपासुन शेतामध्ये काम करण्यासाठी जात असते आणी अचानक पाऊस जर आला तर मात्र नाल्याला पुर येतो व शेतकरी पाणी उतरण्याची वाट पाहत असते त्याच प्रमाने रोहणी येथील जनतेला नेहमी धानोरा येथे ये जा करावी लागते मात्र पावसळ्या येत असलेल्या पुरामुळे धानोरा व रोहणी येथील जनता हैराण झाली आहे .या नाल्याला जवळ पास तिन नाल्याच्या सगम आहे आणि या नाल्यावर असलेल्या रपटयामुळे संपुर्ण पुराचे पाणी धानोरा या गावांमध्ये घुसते त्यामुळे अनेक जनतेचे नुकसान सुद्धा होत असते ,दि. 9 ,7,2022 ला झालेल्या पावसामुळे धानोरा या गावांमध्ये पुराणे रूद्र रूप धारण केले होते ,धानोरा येथील जनतेचे खुप प्रमाणात नूकसाना झाले आहे त्यामुळे धानोरा व रोहणी या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर मच्छाच्यां पुलाची मागणी जोर धरत आहे.
