सरसकट सर्व शेतक-यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा:-भा.ज.पा. चे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट. प्रफुल्लसिंह चौहान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

बाजार समिती निवडणूकी करीता शेतक-यांना ५ वर्षात किमान ३ वेळा बाजार समिती मध्ये शेतमाल विकी करणे अनिवार्य असल्याची अट हि शिथील करणे आवश्यक आहे, कारण अनेक शेतकरी बाजूच्या तालुक्यातील बाजार समिती मध्ये शेतमाल विकतात तर, अनेक जण चढ्या भावाने खाजगी व्यापा-याकडे माल विकी करतात त्यामुळे असे शेतकरी मतदाना पासुन वंचीत राहण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांशी बोलणे झाले असुन आ. डॉ. अशोकराव उईके यांचे मार्गदर्शनात लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतमाल विकीची अट शिथील करण्या येवून सरसकट सर्व शेतक-यांना सरसकट मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात यावा याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे भा.ज.पा. चे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट. प्रफुल्लसिंह चौहान यांनी सांगीतले.