किशोर तिवारी यांचा १ एप्रिलचा २०२२चा यवतमाळ जिल्हा दौरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

मारेगाव तालुक्याचा खैरगाव भेदी कोलाम पोडावर सरकार आपल्या दारी कार्यक्रम
संध्याकाळी ५.३० वाजता खैरगावभेदी येथील कोलाम पोडावर पांढरादेवी ते खैरगाव गाव रस्त्याचा मोबदला , जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र , अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा
संध्याकाळी ७ वाजता बोटोणी येथील कोलाम पोडावर जमिनीचे पट्टे ,जातीचे प्रमाण पत्र , अन्न ,आरोग्य व सामाजिक सुरक्षा ,वीज ,घरकुल,कृषी योजना , आदिवासी योजना या बाबत असलेल्या योजनांचा आढावा .
कोलाम पोडाच्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमाचा समस्यांचा पाठपुरावा मुख्यमंत्री स्वतः करीत असुन या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी आदीवासी विकास ,मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद ,महसूल ,आरोग्य, कृषी,वन ,वीज ,भूसंपादन ,बांधकाम विभाग , सिचन विभाग ,सहकार प्रशासनाचे जिल्हास्तरीय अधिकारी सतत उपस्थित राहत नसुन आपले तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा देत नसल्याच्या तक्रारी येत असतात तरी जिल्हास्तरीय अधिकारी यांना प्रोटोकॉल लागू होत नसल्याचा अनुभव व शेतकरी तसेच आदीवासी यांच्या मुलभूत समस्यां सोडविण्यात रस नसल्याचे दिसते हा मस्तवालपणा नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सूचना द्याव्यात जर उपस्थित राहणे बंधनकारक नसल्यास तशी लेखी सूचना शेतकरी मिशन द्यावी
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम