

प्रतिनिधी :(प्रवीण जोशी ) ढानकी, ता उमरखेड जिल्हा यवतमाळ
तरुण सुशिक्षित वर्ग सहसा शेती करण्यास धजावत नाही कारण शेतीव्यवसाय हा पूर्ण पणे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून तर आहेच शिवाय शेतातील परिपक्व झालेल्या मालास योग्य भाव बाजारपेठेत मिळतो का नाही या बाबीची शाश्वती नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण सद्या शेती करताना अनुत्सा ही आहे असे चित्र बघायला दिसत आहे .पण ढानकी पासून जवळच असलेल्या कृष्णा पूर गावच्या दोन तरुण तडफदार व आदर्श शेती करणाऱ्या तरुणाची महाराष्ट्र राज्य उत्पादक संघ व संस्थापक अध्यक्ष अतुल नाना माने पाटील यांनी निवड केली आहे यामधे गावचे उच्च विद्या विभूषित सचिन राव पाटील नलावडे यांची अमरावती विभाग उपाध्यक्ष या पदावर निवड झाली तर सचिन शक्करगे यांची अमरावती विभाग सचिव म्हणून निवड झालेली आहे. सचिन शक्कर रगे यांनी टरबूज पिकाचे भरघोस उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला तर सचिन पाटील यांनी आपल्या व्यस्त वेळा तील वेळ देऊन अनेक तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत ही एक कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. सचिन शक्क रगे यांनी मागील वर्षी 5 एकरात विक्रमी 300 ऊस कारखान्याला गाळ पाला पाठविला त्यांनी 8032 या वाणाची निवड केली होती या वर्षी एकरी 100 टन उत्पादन होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. एकाच गावातील दोन तरुण शेतकऱ्याची अशा पद्धतीने निवड झाल्यामुळे या तरुण शेतकऱ्यांनी कृष्णापूर गावाला पंच कोषीत मानाचे स्थान मिळवून दिले.
