
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ
पांढरकवडा 08/04/2021
यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ असून या प्राथमिक केंद्रात केळापूर तालुक्यातील जवळपास 33 गावातील लोक उपचारासाठी येतात. व सध्या चालू असलेल्या लसीकरणाला तालुक्यातील जवळपास दररोज 50 लोक लसीकरण करुन घेत असे पण काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. व त्याचीच झळ ही प्राथमिक आरोग्य केंद्राला बसली आहे.
आज रोजी लसीकरण करायला आलेल्या काही लोकांना लस न घेताच परतावे लागले कारण पहापळ आरोग्य केंद्रातील कोरोना लसीचा साठा संपला असे प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ कडून सांगण्यात आले व जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत लसीकरण कार्यक्रम बंद राहणार असे तेथील अधिकारी यांनी सांगितले.
