संशयित चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांवर केला हात साफ ,चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद मार्डी येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील एका शेतातून बंड्यावरुन संशयिताने सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारत पोबारा केला असल्याची. घटना काल दि.२७ नोव्हेंबर रोज शनिवारी रोजी पहाटेच्या ५ वाजताचे सुमारास घडली असून, संशयित आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाला आहे.याघटनेची सविस्तर माहिती अशी कि डॉ.राहुल ठाकरे यांच्या शेतातील बंड्यात सालगडी देविदास महादेव जवादे पत्नी व दोन मुलांसह मागील सात महिन्यापासून वास्तव्याला आहे. जवादे यांचे कुटुंब कामात व्यस्त असतांना संशयित हा बंड्यात घुसला. अंदाजे काळ्या बॅगमधील जवळपास १४ हजार रुपयांचे सोने लांबविले.

दरम्यान, संशयित हा दुचाकीने आला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेची पोलिस ठाण्यात फिर्यादी देविदास जवादे यांनी तक्रार दाखल केली असून, पोलीस संशयीताच्या मागावर आहे.