
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
नागपुरवरून यवतमाळ येथे कारने घरी येत असताना युवक अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी बुट्टीबोरी पोलीस स्टेशनला धाव घेतली. तक्रारदार मंजीरी मोहन खोंड (४२) रा. पठाणपुरा विठ्ठलमंदीर वार्ड चंद्रपुर त्यांचा भाऊ मंदार प्रकाश देशमुख (३८) हा काल नागपुरवरून यवतमाळला कारने आई, बहीन कारचालकासह जात असताना बुट्टीबोरी समोरील मयुर ढाब्याजवळ टॉयलेटला जातो असे सांगुन कारमधुन उतरला पायातील चप्पल बाजुला काढुन कुणाला काहीही न सांगता कुठेतरी निघुन गेलेला आहे. परत आला नाही. अशा तक्रारीवरून हरवलिलेल्या डायरीत नोंद घेण्यात आली आहे. मात्र यवतमाळ शहरात विविध चर्चेला उधान आले असून कुटुंबीयांनी शोध सुरू केला आहे.
