मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे शेती उत्पन्नात कमालीची घट झाली….

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

या वर्षी सरासरी च्या जवळपास दुप्पट पाऊस पडला.परीणामी कापूस व सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही महत्त्वाच्या पीक उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.यदा बाजार भाव चांगला मिळत असला तरी परतीच्या पावसाने मात्र अक्षरशः कापसाच्या वाती अन् सोयाबीनच्या घुगऱ्या केल्या आहेत.
जून जुलै ऑगस्ट या महिन्यात शेतीसाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने सर्व मशागती ची कामे कमी मजूरी मध्ये झाली.पण मात्र सप्टेंबर महिन्यात धुवांधार पाऊस पडला आणि पऱ्हाटीचे बोंडे काळी पडून सडण्यास सुरुवात झाली,सोयाबीन च्या शेंगाना कोंब फुटून पार सत्यानाश झाला.
या नंतर पावसाने दहा पंधरा दिवस उसंत दिल्याने पीकात थोडीफार सुधारणा दिसू लागली.कापूस मोठ्या प्रमाणावर वेचणी साठी व सोयाबीन सोंगण्या साठी तयार असताना परती च्या धुवांधार पावसाने खूप मोठे नुकसान करुन टाकलं.
हातातोडाशी आलेला घास निसर्गाने ओढून घेतला.
कापस ओलागच्च असल्याने भाव कमी मिळाला. तर काढलेले सोयाबीन अद्यापही ओलसरच आहे.
या हंगामात कापसाला सात हजार दोनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. पण सोयाबीन चा उतारा कमी आणि भाव ही कमी,
त्यामुळे केलेला खर्च देखील निघाला नाही..
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शासन दरबारी तक्रार निवेदन देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ही त्यातला त्यात समाधानाची बाब आहे. पण मात्र प्रशासना कडून अद्यापही मदत जाहीर झाली नाही.या हंगामात बाराशे मिलीमीटर पाऊस पडला असल्याने समजते.कापुस व सोयाबीन हे दोन्ही हंगाम एकत्र आल्याने मजुर वर्गांचा तुटवडा भासत आहे.
सध्या सर्व शेत शिवारात कापूस मोठ्या प्रमाणावर फुटून आहे,पण मजूर उपलब्ध नाही. शहरातील व गावांमधील मजूर इतर गावातील शेतकरी जास्त मजूरी देऊन घेऊन जात असल्याचे शेतकऱ्यांची डोकंदुखी आणखीन च वाढलेली आहे हे विशेष..