गिरिधर ससनकर गुरुजी यांना “राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार” जाहीर राळेगाव येथील एकमेव सामाजिक व्यक्तिमत्त्व पुरस्कार चे मानकरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राष्ट्रीय पुरस्कार चे मानकरी गिरीधर ससनकर गुरुजी यांना २०२२चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा वर्धा येथे प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे उपाध्यक्ष मा.प्रा.मोहणजी वडतकर संचालक सौ रेखा निमजे श्रीमती आशा काळे यांनी नवागत कलावंत लेखक कवी साहित्यिक विचारवंत यांच्या यांच्या विचारांला “एक विचार मंच” निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार घराघरात पोहचला पाहिजे या साठी “तुकड्या ची झोपडी” ही वैचारिक पुस्तिका मध्ये नवागत लेखक, साहित्यिक यांचे लेख आत्मकथन, अनुभव आपण प्रकाशित करत आहोत आणि उत्कृष्ट लेखन साहित्याला “राष्ट्रसंत माणिक रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येतं आहे.

राळेगाव येथिल श्री गीरीधर ससनकर गुरुजी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणी आपल्या लेखनातून मांडल्या होत्या आणि त्यांची निवड एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वैचारिक लेखन साहित्याला पुरस्कार देऊन करण्यात आली आहे म्हणून त्यांचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे. गोविंद चव्हाण अरविंद डंभारे रमेश खन्नी दत्ता मरस्कोले नितीन ठाकरे वाल्मिक मेश्राम भगवंत धनरे शंकर तोडासे गजानन झाडे इश्यु माळवे इंदरचंद बैद अनेकांनी केले मनःपुर्वक अभिनंदन……!!