यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल
पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात अनेक मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहीती भाजपचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ॲड प्रफुल चौव्हाण यांनी सांगितली आहे ही माहिती एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप मधून समोर आली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा भाजप जिल्हा अध्यक्ष यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. अशातच, ॲड प्रफुल्ल चौव्हान यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली असून मंत्री डॉ. अशोक उईकेंनी या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय.
मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पोलीस अधीक्षक अशोक थोरातांना या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. राळेगाव पोलीस स्टेशनला येऊन मंत्री अशोक उईकें यांनी उपविभागीय अधिकारी बन्सल यांच्याशीही या प्रकरणी चर्चा झाली असून या प्रकरणात जातीने लक्ष घाला, वेगानं तपास करा, अशा उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई केली जाते, आणि तपासाअंती नेमकी काय माहिती समोर येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
आरोपीला मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करा:-
भाजप जिल्हाध्यक्ष ॲड प्रफुल्ल चौव्हान
प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. त्यांनतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना त्याला पुन्हा पकडले गेले. यात पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांना तपासापासून दूर ठेवावे, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यात मुलींना त्याच्या पालकांना पैश्याचे आमिष देऊन अश्या पध्दतीने फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब आहे. गृह विभागकडे याबाबत माहीती दिली आहे. राज्य सरकार सुद्धा गंभीर आहे. यात लवजिहाद, धर्मांतर असा अँगल असू शकतो, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष ॲड प्रफुल्ल चौव्हान यांच्याकडून करण्यात आली आहे.
आरोपीच्या अतिक्रमित घरावर कारवाई
शहरांतील वली दादा बादशहा दर्गा परीसरात आरोपी अतिक्रमण करून राहत होता त्या अतिक्रमित घरावर नगर पंचायत राळेगाव येथील मुख्यधिकारी गिरीश पाळेकर यांनी कार्यवाही करून जे शी बी मशीन व्दारे घर भुईसपाट करण्यात आले यावेळी शहरांतील नागरीक उपस्थित होते.
विविध संघटना कडून पोलीस स्टेशन राळेगाव येथे निवेदन सादर
आरोपीवर कठोर कार्यवाही करण्यासाठी यवतमाळ सह शहरांतील विवीध संघटना व जनतेकडून राळेगाव पोलीस स्टेशनला निवेदन सादर करून त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी विवीध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते अनेक महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते.
