चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस बस फेरी शाहिद दिनी होणार सुरू:भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या मागणीला यश

7

चिमूर क्रांती भूमीतील शहिदांनी केलेल्या क्रांतीचा इतिहास जनसामान्यांच्या आठवणीत राहावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाने चिमूर-आष्टी सुपर एक्सप्रेस या नावाने एसटी बस फेरी सुरू करण्यात आली होती. मात्र मागील अंदाजे 30 वर्षां पूर्वी पासून सदर बस राज्य परिवहन महामंडळ चिमूर आगारा ने बंद केली. चिमूर-आष्टी क्रांती भूमीला तसेच शहिदांना देश पातळीवर सन्मान मिळावा व दोन्ही क्रांतिभूमी चा राज्य व केंद्र सरकारने सर्वांगीण विकास करावा. याकरिता भारतीय क्रांतीकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सारंग दाभेकर यांनी उपरोक्त मागणीसह 31 मागण्यांचे निवेदन संबंधित विभागांना देऊन चिमूर येथील शहीद स्मारका समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते तेव्हापासून वारंवार मागण्यांचा पाठपुरावा करीत चिमूर-आष्टी बस सेवा पूर्ववत सुरू करण्या मागील भूमिका राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना समजून सांगितली शेवटी सारंग दाभेकर यांनी मांडलेल्या भुमिकेचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाने चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस बस फेरी पूर्ववत सुरू करून क्रांतिभूमी व शहिदांना परत सन्मान मिळवून दिला.
जनतेला आव्हान
चिमूर ते आष्टी मार्गावरील प्रवास करावयाचा झालाच तर जनतेने चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस या बसने च प्रवास करावा. यामुळे या बसची मिळकत जास्त प्रमाणात राहून ही बस पुन्हा बंद करण्याची वेळ आगारावर येणार नाही. चिमूर-आष्टी या क्रांती भूमीतील इतिहास जागृत ठेवण्याकरिता पुढील पिढीला इतिहासाची माहिती राहण्याकरता ही बस सेवा नियमित सुरु ठेवणे आपले कर्तव्य आहे.
परत मिळाला सन्मान
भारत देशाला स्वतंत्र करण्याकरिता 16 ऑगस्ट 1942 रोजी चिमूर आणि आष्टी या गावांनी इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन करून स्वातंत्र्य मिळवून दिल. अशा या क्रांती भूमी ला चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस या नावाने बस सुरू होऊन एक सन्मान मिळालेला आहे. क्रांतिभूमी प्रति आपली सद्भावना प्रकट करण्याकारिता व शहिदांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आष्टीला जाऊन क्रांतिभूमी च दर्शन घ्यावं. असे सारंग दाभेकर जनतेस आव्हान करीत आहेत.चिमूर-आष्टी क्रांती एक्सप्रेस बस हि चिमूर मधून सकाळी 7:00 वाजता व आष्टी मधून परत दुपारी 1:00 वाजता ची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.

सारंग दाभेकर
जिल्हाध्यक्ष
भारतीय क्रांतीकारी संघटना