सासऱ्याचा सुनेवर अत्याचार, सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल.

नितेश ताजणे वणी.

वणी शहरातील माहेरी आलेल्या ३३ वर्षीय सुनेला नेण्यासाठी आलेल्या ५९ वर्षीय वासनांध सासऱ्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून आपलेच सुनेवर अत्याचार करून पळ काढल्याची व नात्याला काळीमा फासणारी घटना वणी शहारत घडली आहे.

वणी शहरातील पिडीत मुलीचा २०१६ साली चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर जवळील एका गावातील तरुणाशी विवाह झाला होता. पीडित विवाहित तरुणी या विकृती मुळे त्रस्त असल्याने गेल्या दिवाळीला ती माहेरी आली होती. तेव्हापासून आईवडिलांकडे माहेरीच राहत होती. ६ जानेवारी ला सासरा तिला घेऊन जाण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडील सकाळी नऊ वाजताचे सुमारास कामावर गेले होते. मुलगी व तिचा सासरा घरी होते. पीडित महिला वरच्या रूममध्ये झोपून होती. मुलीची आई घरात नसल्याची संधी साधून वासनांध सासरा ती झोपून असलेल्या खोलीत गेला आणि बळजबरीने सुनेवर दुष्कर्म करीत होता. तितक्यात पीडितेची आई दुपारी पावणे बाराच्या सुमारास घरी आली. घरात मुलगी दिसली नसल्याने तिने वरच्या खोलीकडे जाऊन बघितले असता सासरा सुनेवर दुष्कर्म करीत असल्याचे मुलीच्या आईने ते दृश्य बघितले. दृश्य बघताच ती हादरून गेली. इकडे सासऱ्याचा कृत्याचे बिंग फुटले. सुनेवर दुष्कर्म करीत असताना रंगेहाथ सापडल्याने क्षणाचाही विलंब न करता सासऱ्याने घरातून धूम ठोकली. आणि तेथून पसार झाला. त्यानंतर वडील कामावरून घरी परत आले असता, मुलीच्या आईने सर्व हकीकत कथन केली. सुरुवातीला पीडिता घाबरून असल्याने तिने काही सांगितले नाही. मात्र आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता. लग्नानंतर सासरा संधी साधून वारंवार बळजबरीने अत्याचार करीत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर रविवारी पीडितेला सोबत घेऊन तिच्या आईने वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली त्यावरून नात्याला काळिमा फासणाऱ्या सासऱ्या विरुद्ध भा दं वि कलम ३७६ (२)(F)(N),व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हिरे ,शुभम सोनूले करीत आहेत. दुष्कर्म करून पसार झालेल्या सासऱ्याचा पोलीस शोध घेत आहे