आजीबाईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्याचा पोबारा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील ७५ वर्षीय आजीबाईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कानातील डुल व मोबाईल असा ऐवज अनोळखी चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना दि. १० ऑक्टोंबरच्या रोज रविवारच्या रात्री साडेअकरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याची घटना घडली. याप्रकरणी आजीच्या नाताने गजानन आस्वले यांनी दोन संशयित चोरट्या विरोध मारेगाव पोलीसात तक्रार दिली.

सविस्तर माहिती आजीबाई विठाबाईन झाडे ७५ वर्षीय आजीबाई घरात झोपून असल्याने व गावात दुर्गादेवी निमित्ताने आर्केस्ट्राचा कार्यक्रम असल्यामुळे घरातील मंडळी कार्यक्रम पाहायला गेली होती. आजीबाई ही गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र कानातील डूल व मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असुन याघटनेची तक्रार मारेगाव पोलीसात दाखल केली असून. याघटनेचा तपास मारेगाव पोलीस करत आहे.