
गायत्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उत्तम राठोड यांचा पुढाकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रस ,दारव्हा नेर ,विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकनेते ,तथा विकास पुरुष,कर्मवीर संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२४ जून २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत राठोड हॉस्पिटल शंकर नगर दिग्रस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्षडॉ. उत्तम राठोड यांनी केले असून वाढते संक्रमित आजार ,वाढती लोकसंख्या व रक्ताचा रक्तपेढी तील तुटवडा ,पाहता गरजू रुग्णांना रक्त न मिळाल्याने वेळ प्रसंगी आपला जीव सुद्धा गमवावा लागतो हे पाहता रक्तदान शिबिराचे आयोजन करून ,रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा हा लहानसा प्रयत्न, गायत्री फाउंडेशनने केला आहे.
आपण सर्व या सत्कर्मा मध्ये,सहकार्य करू या आपल्या नाशवंत, देहाचा आपल्या प्रियजनांना ,कसा लाभ होईल ,असा लहानसा प्रयत्न करू या रक्तदान नव्हे तर हे जीवदान आहे सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान रक्ताला जात ,धर्म,पंथ ,नसते या मानवी कार्यात आपण सहकार्य करून ,विकास पुरुष कर्मवीर आमदार संजय दुलीचंद राठोड या लाडक्या नेत्यांचा ,वाढदिवस रक्तदानाचा संकल्प करून ,करूया असे आवाहन गायत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उत्तम राठोड यांनी केले आहे.
यापूर्वी सण २०१९,२०,२१,२२ या चार वर्षांमध्ये विविध, समाजोपयोगी. सामाजिक कार्य, जनहितार्थ भावनेतून केले आहे व त्यांनी कोरोणा संसर्गजन्य आजाराच्या काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता दिग्रस ,दारवा ,नेर ,मानोरा,अशा विविध तालुक्यात ,मोफत औषधे वितरण करणे ,शिबीर घेणे ,मागील वर्षी तर चक्क ५८ गावे व त्या गावातील भूमिहीन ,गरजू ,गरीब, दारिद्र्यरेषेखालील ,कुटुंबांना दत्तक घेऊन ,त्यांना (सहा महिने) राठोड हॉस्पिटल शंकर नगर दिग्रस च्या माध्यमाने, मोफत आरोग्यसेवा ,जवळपास नऊ हजार कुटुंबांना त्यांनी पुरविली आहे. ते एकमेव वैद्यकीय व्यवसायिक असे आहेत ,की ज्यांनी वैद्यकीय व्यवसायाला न्याय देऊन ,सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हे मात्र नक्कीच.! यापुढेही के सामाजिक राजकीय व जनहितार्थ कार्य करीत राहतील ,असा संकल्प त्यांनी संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त जनप्रतिनिधी ला बोलून दाखविले असे गायत्री फाऊंडेशनचे अध्यक्षडॉ. उत्तम राठोड यांनी सांगितले.
