
प्रतिनिधी:चंदन भगत, आर्णी(८६९८३७९४६०)
यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावून काढनीस आलेल्या सोयाबिन पिकाचे आतोनात नुकसान केले.अश्याच प्रकारे पावसाने जर नको त्या वेळी आगमन केल्यास कपाशी सुद्धा हातात येऊन,पीकाचे नुकसान होऊ शकते.पावसामुळं कापसाची बोन्डे सडून खराब होईल.हवामान खात्याने सुद्धा यवतमाळ जिल्ह्याला गुलाब चक्रीवादळाच्या वेळी रेड अलर्ट जारी केला होता.आपला देश हा कृषीप्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने ५०,०००(पन्नास हजार ₹) मदत जाहीर करावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष सचिन यलगन्धेवार, शहराध्यक्ष कपिल ठाकरे, तालुका उपाध्यक्ष चंदन भगत, तालुका सचिव भुषण पाटील व महाराष्ट्र सैनिकांनी केली आहे.
