मारेगाव तालुक्यात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात भारत बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र या विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नव्हते. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी शांत का आहेत? असे प्रश्न उपस्थित होत होते, परंतु शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केल्यानंतर मात्र महाराष्ट्रात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकरी आंदोलनात उतरले आहे. दरम्यान नरेंद्र मोदी सरकारनी जे कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मारेगाव येथे भा ज पा वगळता सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱयांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध “मोदी सरकार मुर्दाबाद, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्याच पाहिजे, मोदी सरकारच करायच काय ? उलटे डोके वरती पाय, भारत माता की जय” ,मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद म्हणत शेकडो शेतकरी रस्त्यावर होते. मंगळवारला सर्व बाजारपेठ १०० % बंद ठेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला, या सर्व पक्ष व सामाजिक संघटनेच्या आंदोलनात मोदी सरकार विरोधी घोषना देऊन केन्द्र शासनाचा निषेध केला, दिवसभर मारेगांव बाजारपेठ कडकडीत बंद होती.