
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जून महिन्यात अपुरा पाऊस पडला,बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली,उगवलेली कोवळी कोंब आता मरत आहेत,बहुतांश शेतकऱ्यांनी मोड केली असल्याने प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती राळेगांव चे माजी सभापती प्रशांत तायडे यांनी केली आहे.
विशेषतः वरध सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणी चे संकट उद्भवले आहे. राळेगांव तालुक्यात सरासरी मध्ये सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे .
दरवर्षी जून महिन्यातील पेरण्या साधल्या जातात.परंपरे नुसार या वेळी सुद्धा एक दोन पाऊस पडल्या नंतर पेरणी केली पण पाऊस सतत हुलकावणी देत असल्याचे,दुबार पेरणी शिवाय पर्याय च नाही, प्रशासनाने याचा सारासार विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती राळेगांव चे माजी सभापती प्रशांत तायडे यांनी केली आहे.
