धक्कादायक:सुनेने चालवली सासुवर रिव्हॉल्व्हर ने गोळी सासु जागीच ठार,

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील प्रभाग 2 शिवाजीनगरमध्ये घडलेले बहुचर्चित दुहेरी प्रकरणातील सासूच्या खुनाचे प्रात्यक्षिक सुनेने पोलिसांना 25 जानेवारीच्या संध्याकाळी करून दाखवले असून यामधील चोरलेल्या रिव्हॉल्व्हरच्या 7 राऊंड पैकी 5 राउंडच मिळून आल्या. तर 6 वा राऊंड वृद्धेच्या डोक्यात मिळून आला होता. तर गायब असलेला दुसरा राऊंड पाणी साठवणुकीच्या मेटलमध्ये घटनास्थळी पोलिसांना आढळून आली आहे. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात कलम 302 व शस्त्र अधिनियम1959 (3), शस्त्र अधिनियम 1959 (25) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

खुनात संशयित आरोपी सून सरोजला 25 जानेवारी रोजी आर्णी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 27 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी ठोठावली. पोलिसांनी त्याच दिवशी संध्याकाळी संशयित आरोपीला घटनास्थळी नेऊन खूनाचे प्रात्यक्षिक करून घेतले. दरम्यान सून सरोजने रिव्हॉल्व्हर मधून गोळी चालविण्याची ट्रायल मेटलच्या भरण्यावर एक दिवस आधी केल्याचे सांगितले. मेटलच्या भरण्याला छिद्र पडले असून रिव्हॉल्व्हर मधून सोडलेली गोळी पोलिसांना भरण्यात मिळून आली आहे.

मृतक सासू आशा किसनराव पोरजवार घटनेच्या वेळी जमिनीवर बसून पूजा करत असताना, मागून आपण (सून- सरोज अरविंद पोरजवार) कशी रिव्हॉल्व्हरची गोळी चालविली याचे पोलिसांच्या कॅमेऱ्यासमोर प्रात्यक्षिक करून दाखविल्याचे यावेळी समजले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार पितांबर जाधव, एपीआय नागेश जायले, पीएसआय किशोर खंडार, सतीश चौदार, दिनेश जाधव, मनोज चव्हाण, महिला पोलीस कर्मचारी इत्यादी पोलीस पथक उपस्थित होते.