
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
११ जानेवारी रोजी सांयकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान उमरखेड येथिल आर.पी . उत्तरवार कुटिर रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ.हनुमंत संताराम धर्माकारे यांची उमरखेड – पुसद रोडवर साकळे विदयालय समोर एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली होती या प्रकरणी तीन आरोपी पोलीस पोलिसांनी जेरबंद आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की,सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन पोलीस अधिक्षक , यवतमाळ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन घटनास्थळाची पाहणी केली.पोलीस स्टेशन उमरेखड , बिटरगाव , पोफाळी , दराटी यांचे प्रत्येकी एक एक पथक , स्थागुशा येथील चार पथके व सायबर सेलचे दोन पथक असे एकुण दहा पथके तयार करण्यात आली . सदर पथकांना योग्य ते मार्गदर्शन करुन जिल्हयातील व जिल्हयालगतच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या . स्थागुशा व सायबर सेल यांनी मृतक यांचा पुर्व इतिहास,कौटुंबिक कलह व आर्थिक वाद याची पडताळणी केली , घटनास्थळावरील तसेच उमरखेड शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे तसेच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांना तपासण्याचे आदेश दिले होते.वैदयकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्माकारे यांचा पुर्व इतिहास , कौटुंबिक पार्श्वभुमि व आर्थिक वाद यावरुन डॉक्टर यांचे मृत्यूस असे भक्कम कारण शोधण्याकरीता प्रयत्न करण्यात आले होते यामध्ये डॉ .हनुमंत धर्माकारे यांच्या वैद्यकिय सेवाकाळात घडलेल्या घटनांबाबत देखील सखोल माहिती प्राप्त करण्यात आली .
या दरम्यान ४ मे २०१९ चे रात्री दोनच्या सुमारास स्थानिक शिवाजी चौक येथे मोटार सायकलचा अपघात झाला होता , त्या अपघातात एक इसम गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले.त्यादरम्यान जखमी याचा मृत्यू झाला , त्यावेळस आर .पी . उत्तरवार कुटिर रुग्णालय येथे डॉ.हनुमंत धर्माकारे हे कर्तव्यावर हजर होते.वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्माकारे यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपी अटकेत
