
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कळंब तालुक्यातील बेलोरी गटग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी झालेल्या निवडणूकीत ओबीसी सरपंच पदांचे आरक्षण निघाले होते परंतु येथे ओबीसी मधील एकही सदस्य निवडुन न आल्यामुळे एक वर्षापासून या ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच अरुण वाघमारे यांनी चांगल्या प्रकारे कारभार सांभाळला व अखेर या ग्रामपंचायती मध्ये अनु. जाती महिला चे आरक्षण निघाले व ईंदुताई मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली.
या ग्रा.पं. मध्ये बेलोरी गांधीनगर ऊमरपोड या तीन गावाचा समावेश असून गेल्या पंचविस वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून श्रीमती ईंदूताई मस्के कार्यरत आहे. प्रत्येक गावातील पुढारी आपल्याच गावातील सरपंच व्हायला पाहिजे याची चुरस असते तशीच चुरस यावेळी सुध्दा पाहायला मिळाली व शेवटी बेलोरी ऊमरपोड येथील सदस्य यांनी एकमेकांशी असलेले मतभेद विसरून एकत्र आले.
श्रीमती ईंदूताई मस्के ह्या उच्चशिक्षित परिवारातील राजकिय वारसा लाभलेल्या महिला असून त्या परिवारातील दोन्ही मुले चांगल्या नोकरीला असून एक मुलगा हा श्री लखाजी महाराज विद्यालयात गणित शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर विशाल मस्के सरांची पत्नी सुध्दा बेलोरी गावच्या उच्चशिक्षित पोलिसपाटील म्हणून कार्यरत आहे.श्रीमती ईंदूताई मस्के यांचे माहेर सुध्दा राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथील राजकिय वारसा लाभलेल्या उमरे घराण्यातील आहे.
यावेळी येथील उपसरपंच अरुण वाघमारे यांनी एक वर्षापासून मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन घोडाम यांनी गौरव करण्यात आला.
