
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 13. आॅगस्ट रोजी स्मॉल वडंर कान्व्हेंट वडकी येथे करण्यात आले
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटींग हे दरवर्षी स्व. मोहीत यांच्या स्मृतिदिनानिमीत्य सामाजिक जाणिवेतून सामाजिक उपक्रम राबवित असतात.
स्व मोहित यांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते.आपल्या एकूलत्या एक मुलाचे देहदान करण्याचा निर्णय राजेंद्र झोटींग यांनी घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता हे विशेष.
या आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा आमदार अशोक ऊईके यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अँड वामनराव चटप माजी आमदार राजूरा,तर प्रमुख उपस्थिती डॉ. सिंधुताई मांडवकर (साहित्यिक, माजी प्राचार्य इंदिरा महाविद्यालय कळब), डॉ रविंद्र कानडजे (तहसीलदार राळेगाव), प्राचार्य मजूंषा सागर, सरपंचा मोनिकाताई देठे या मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न होईल.
दि.१३ दिनांक आॅगस्ट ला होणाऱ्यां सर्व रोगनिदान शिबिराचां तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा व रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यासाठी तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राजेंद्र झोटींग व दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले.
