महिको सिड्स तर्फे सखी गावामध्ये जागतिक महिला दिवस साजरा

         

संपुर्ण जगभर महीला दिन हा उत्साहात साजरा केला जातो, शुक्रवार दिनांक 11 मार्च 2022 रोजी महिको सिड्स च्या आयोजनाने सखी या गावामध्ये जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला व शेतकरी महिलांचा सन्मान करण्यात आला व तसेच महिको चे दमदार कपाशी वाण जंगी आणि धनदेव प्लस या वाणाची माहिती मार्गदर्शन शेतीविषयक श्री कमलाकर धगडी सर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन महिको सिड्स चे पांढरकवडा प्रतिनिधी श्री.बबन गुरनुले यांनी केले यावेळी सखी गावातील नागरिकांनी उत्फुर्त असा प्रतिसाद दिला तसेच या कार्यक्रमाला महिको सिड्स कंपनीचे चे अधिकारी व सखी गावचे गावकरी नागरिक उपस्थित होते..