
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दि. १ ऑगस्ट २०२२ रोजी “महसूलदिनाचे” औचित्त साधुन आमचे मित्र महा.राज्य गाव कामगार संघ तालुका शाखा राळेगांवचे शाखा सचिव आणि मौजा पिंपरी दुर्ग येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री. लक्ष्मणराव एडस्कर यांची उत्कृष्ठ पोलीस पाटील म्हणुन निवड करून त्यांना उत्कुष्ठ पोलीस पाटील म्हणुण मा. श्री. येडगे साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे उपस्थितीत मा. श्री. भुजबळ साहेब पोलीस अधिक्षक यवतमाळ यांचे हस्ते राळेगांव उपविभागीय स्थरावरील प्रमाणपत्र प्रधान करून गौरवित करण्यात आले. त्याबद्दल मा. जिल्हाधीकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब तसेच मा. उपविगीय अधिकारी साहेब, मा. तहसिलदार साहेब आणि मा. ठाणेदार साहेब राळेगांव यांचे आभार आणि धन्यवाद.
