शिक्षक समिती कडून सेवार्थ पाणपोई चा शुभारंभ

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राळेगाव यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ पाणपोई चा उद्घाटन सोहळा पंचायत समिती कार्यालय येथे पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी तथा गटविकास अधिकारी सन्माननीय श्री. पद्माकर मडावी साहेब, शिक्षण विभागाचे प्रमुख तथा गटशिक्षण अधिकारी ,श्री. शेख लुकमान साहेब, रावेरी गावचे प्रथम नागरिक राजेंद्र तेलंगे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरलाताई देवतळे, श्री. काचोळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिक्षकांच्या प्रश्र्नासंबंधी नेहमी अग्रगण्य असतांना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत असते दरवर्षी पेक्षा या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाणपोई च्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न शिक्षक संघटनेकडून होत आहे.
या सेवार्थ पाणपोई चे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सन्माननीय श्री पद्माकर मडावी साहेब यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका शाखेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी गटविकास अधिकारी साहेब व गटशिक्षाधिकारी साहेब यांनी शिक्षकांच्या माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्याच्या वेतनाचा प्रश्न प्राधान्याने निकाली काढल्यामुळे त्यांचे या प्रसंगी अभिनंदन करून आभार आपल्या प्रास्ताविकातून मानले.
या सेवार्थ पाणपोई उद्घाटन सोहळयास पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी श्री वननालवर साहेब ,श्री वाईकर साहेब, श्री मस्के साहेब, श्री टिकले, श्री दिनेश वायकर, श्री मनोज कडू, श्री प्रविण ठाकरे, श्री. धिरज खुपाट, श्री. वानखेडे. श्री. कौटखेडे मॅडम, घनशाम कुडमेथे, काळपांडे ताई आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत सिडाम यांनी तर आभारप्रदर्शन संजय एकोनकर यांनी केले. यावेळी शिक्षक समिती चे गजनान यादव, बाबाराव घोडे, पुंडलीक देवतळे, सागर धनालकोट्वार अमोल पोहनकर, देवानंद सोयाम हे उपस्थीत होते.