टेंभूरदरा ते ढानकी रस्त्याची दुर्दशा सर्वसामान्यांचे बेहाल लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष,युवासेनेचे बांधकाम विभागाला निवेदन

(प्रतिनिधी ढानकी:प्रवीण जोशी)

ढानकी ते टेंभूरदरा या रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून खड्यात रस्ता की रस्त्यात खडा हे कळायला मार्ग नाही नुकताच रिमझिम पाऊस पडत असताना फुटभर पडलेल्या खड्या त पडणारे पाणी साचत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना खड्याचा अंदाज येणे कठीण झाले आहे या संबंधित दुर्धर आजारा ना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच टेंभूरदरा या गावची आर्थिक चक्रे ही शेतीमधून निघणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असते आणि उत्पादित केलेलं माल हा ढानकी येथे आणून विकावा लागतो पण सदर रस्ता हा अत्यंत खराब झाल्यामुळे अनेक अडचणींना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे काही दिवसापूर्वी टेंभूरदरा गावच्या शेजारील गावात धाडशी चोरी झाली आणि या ठिकाणी अशा वेळेस पोलिसांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ लागतो .त्यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होऊ शकतो व इथे कापूस उत्पादक सुद्धा जास्त आहे. येणाऱ्या काळात कापूस वाहतुकीसाठी सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते तेव्हा हा रोड त्वरित दुरुस्त व्हावा अशी मागणी गावकरी करत आहे.

चौकट

एखादया वेळेस आजारी पडलेल्या व्यक्तीला दवाखान्यात नेणे खूप जिकिरीचे होते व अनेक विद्यार्थी ढानकी येथे शिक्षणा साठी रोज जाणे येणे करतात त्यांना खराब झालेल्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे तेव्हा संबंधित विभागाने या कडे लक्ष देऊन रस्ता सुरळीत करावा निवेदन देऊन सुद्धा आमच्या मागणी कडे दुर्लक्ष केल्या जात असल्या कारणाने आमरण उपोषणाला सुद्धा बसून आमचा हक्क मिळवून घेऊ

दिलीप जाधव