
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
आज भारतीय स्वातंत्र्याचे अम्रुत महोत्सवी वर्षात किन्ही जवादे ग्रामपंचायत येथे विधवा महिला तसेच सर्व महिलांना सन्मान मिळावा याकरिता ग्रामपंचायत सदस्या श्रीमती मालाताई लोणबले व कीन्ही जवादे ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या संचालीका सौ.त्रिवेणाबाई वाढई यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधवा सन्मान कायदा करण्यात यावा अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अशीही मागणी आहे. महिला शेतकर-यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याकरिता सरपंच सुधीर जवादे यांनी पुढाकार घेतला.
ध्वजारोहणानंतर शासकीय आश्रम शाळा कीन्ही जवादे येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण केल्या गेले,नंतर व्रुक्षारोपण करण्यात आले.मंडळ अधिकारी सानप साहेब, सचिव सुनील येंगडे साहेब, उपसरपंच रमेश तलांडे,सदस्य प्रसाद निकुरे प्रतिभाताई मोहुर्ले सुषमाताई जवादे सिमाताई ऊईके मालाताई लोणबले, कर्मचारी पुंडलिक लोणबले, मारुती ईठाळे धनराज तोडसाम आशावर्कर सुशीलाताई मेश्राम, सर्व शिक्षक व्रुंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
