यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक या संवर्गातील २६ कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कारणास्तव स्थानांतरण

S.P साहेबांनी शाम सोनटक्के यांना
कंट्रोल रूम मध्ये करायला हवे होते अशी जनसामान्यात चर्चा केली जात आहे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक या संवर्गातील २६ कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कारणास्तव स्थानांतरण करण्यात आले. पोलिस निरिक्षक दर्जाचे रामकृष्ण जाधव यांचे पोलिस कंट्रोल मधुन सायबर सेल, धर्मा सोनुने यांचे कंट्रोल रूम मधुन आर्थीक गुन्हे शाखेत, आनंद वागतकर यांचे आर्थीक शाखेतून कंट्रोल रुम, शाम सोनटक्के यांचे वणी ठाणेदार पदावरुन जिल्हा वाहतुक शाखा यवतमाळ येथे तर रामकृष्ण महल्ले वाहतुक शाखेवरून वणीच्या ठाणेदार पदी स्थानांतरण झाले.

स. पो. नि. दर्जाचे गजानन गजभारे यांचे नियंत्रण कक्षावरुन दुरक्षेत्र सावळीसदोबा, श्रीकांत इंगोले कंट्रोल मधुन पासपोट शाखेत संजय अत्राम वाहतुक शाखेतून वणी वाहतुक शाखेत, नागेश जाहीरे यांचे आर्णी वरुन यवतमाळ च्या वाहतुक शाखेत, अमोल मुडे राळेगाव वरुन एल. सी. बी. यवतमाळ, विजया पंधरे कंट्रोल मधुन निर्भया पथक, संजीव खंदारे पासपोर्ट शाखेतून वाहतुक शाखा यवतमाळ, गोपाल उपाध्याय चे कंट्रोल मधुन पुसद ग्रामीण, ज्ञानेश्वर सावंत कंट्रोल मधुन मारेगांव, नागेश खाडे कंट्रोल मधुन अवधूतवाडी, स्वाती वानखडे कंट्रोल मधुन शहर पो. स्टे., निलेश गायकवाड कंट्रोल मधुन पांढरकवडा, सरिता मलखाम कंट्रोल मधून लोहारा राजु नेवारे अधिक्षक कार्यालयातून वाचक फौजदार, अनिल सकवान कंट्रोल मधून मुकूटबन, सोनाली राठोड कंट्रोल मधून लोहारा, कविता फुसे दारव्हा वरुन निर्भया पथक दारव्हा, सोनाबाई कदम पुसद वरुन निर्भया पथक पुसद उपविभाग सुजाता बनसोड उमरखेड वरुन निर्भया पथक, अंजली कानबाळे पांढरकवडा वरुन निर्भया पथक, माया चाटसे वणी वरुन निर्भया पथक अतिरिक्त प्रभार असे स्थानांतरण करण्यात आले आहे व शाम सोनटक्के यांच्या वरती SP साहेब आनंदी होऊन त्यांना ठाणेदार पदावरुन जिल्हा वाहतुक शाखा यवतमाळ येथे स्थानांतरण केले.त्यानी जे कामगिरी बजावली त्यावरून त्यांना कंट्रोल रूम स्थानांतरण करायला हवे होते अशी जनसामान्यात चर्चा केली जात आहे.