
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कीन्ही जवादे ता.राळेगाव.जी.यवतमाळ
बेंबळा कालवे प्रकल्पाचा मुख्य कालव्याचे काम करतांना शेतातील नाली/नाला चे पाणी योग्य पद्धतीने, नैसर्गिक उताराचे दिशेने न करता केवळ औपचारिकता म्हणून काम केल्यामुळे गट क्रं ४२ कीन्ही जवादे येथील आदित्य सुधीर जवादे यांच्या ६ एकर शेतामध्ये ८/१०फुट पाणी साचले आहे.या शेतात हळद,तुर लावलेली आहे.महसुल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी ,कोतवाल यांनी शेतावर जाऊन पाहणी केली आहे.शेतीच्या नुकसानाची भरपाई द्यावी व पाणी निचरा होणारी व्यवस्था बेंबळा कालवे विभागाने करून द्यावी.ही तक्रार दाखल करण्यात यावी.
