
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर
पांढरकवडा 08/04/2021
केळापुर तालुक्यातील सर्वात जास्त महत्वाची ग्रामीण विभागातील बँक म्हणून बँक ऑफ़ महाराष्ट्र शाखा पहापळ हिची ओळख आहे, पहापळ गावाला लागून असलेल्या जवळपास सर्वच खेड्यातील लोकांची आर्थिक देवाणघेवाण ही या बँकेतून चालत असते.
मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील व्यवहार या बँकेत होत असून दररोज हजारो पाचशे च्या घरात लोक दररोज व्यवहार करतात पण तेथील प्रशासनाकडून सोशल डिस्टसिंग चे पालन होत नसल्याचे आढळून आले.
आज रोजी बँक ऑफ महाराष्ट्र पहापळ शाखेचे कर्मचारी यांची चाचणी केली असता त्यातील 2 कर्मचारी पाॅझीटिव्ह आले असून बँक प्रशासनाने सदर आठवडा बँक बंद ठेवणार असल्याची माहिती दिली, व ग्रामपंचायत पहापळ प्रशासन यांनी बँक परिसरात सॅनिटायजेशन करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
