कृषी कन्येने केले बोंड अळी प्रतिबंधक कामगंध सापळया बाबतचे मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा येथील कृषी कन्या श्रेया गजानन निमट या विद्यार्थिनीने कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा व त्या संबंधित घ्यावयाची काळजी तसेच त्याचे फायदे या बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत फेरोमोन सापळ्यां च्या वापरा मुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्यावेळी कीड व्यवस्थापन पद्धती ठरविता येते .
एकत्रित प्रलोभन सापळ्यांचा वापरा मुळे कीटक नाशकांच्या किंमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो .कीड व्यवस्थापनाची ही पद्धत वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे असे मार्गदर्शन केले व तसे प्रात्यक्षिक ही करून दाखविले यावेळी शेतात अमर बबनराव पाल, विलास निखाडे व इतर मजूर वर्ग उपस्थित होते.
या प्रात्यक्षिक साठी कृषी महाविद्यालये प्राचार्य श्री.महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा.विशाल भाकडे , विषय शिक्षक प्रा.वानखेडे ,प्रा. काजल माने व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.