रेती वाहतुकीसाठी हफ्ता वसुली करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

आर्णी तालुक्यातील घाटावरून अवैध रेती वाहतुकीची वसुली करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आर्णी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार तसेच
वाहन चालक सिताराम पवार, अमित झेंडेकर हे रात्रपाळीत गस्तीच्या नावाखाली वाळु तस्करांकडुन दररोज वसुली करत असल्याचे निर्देशनास आले त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या दोघांची गोपनीय माहीती काढली असता ठाणेदाराचे वाहन चालक सीताराम पवार तसेच पोलीस अमित झेंडेकर हे वसुली करीत असल्याचे समजले त्यावरून चौकशी करती तातडीने दोघांनाही निलंबीत करण्यात आले. पोलीसांवर झालेल्या निलंबन कारवाईमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच धास्ती घेतली असून रात्रपाळीतील गस्तीवर जाणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर पोलीस अधिक्षकांकडून पाळत ठेवली जात आहे.