मुकिन्दपुर येथील गणराज्य दिन उत्साहात पार २६जानेवारी प्रजासत्ताक दिन.

तालुका प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी(८६९८३७९४६०)

ब्रिटिश पारतंत्र्याच्या जोखडातुन मुक्त करण्यासाठी अनेक देश भक्तांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र मिळविण्याकरिता जे कष्ट सोसावे लागले ते खूप संयमाने व जोपासुन ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली.संविधान सभेने ठराव मंजूर करून मसुदा समिति गठीत केली.डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समिती च्या अध्यक्षपदी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची नियुक्ति करून त्यांच्यावर संविधान निर्माण करण्याची जबाबदारी दिली. त्याच स्वातंत्र्याला चिरकाल टिकविणे हि आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाला उपस्थित ग्रा.पं.मुकिन्दपुर च्या सरपंच योगिता सुरेश हजारे, उपसरपंच सनी भवरे, माजी सरपंच सदानंद ठाकरे,प्रमुख पाहुणे सुरेश हजारे,शिलूभूषण,अक्षय गेडाम,प्रवीण भवरे,सरला वाघमारे भवरे,नंदाताई लसवंते,सुमित्रा दिघोरे,आशा लसवन्ते व युवा उद्योजक पवनभाऊ वाघमारे सुद्धा उपस्थीत होते. त्यांचा वाढ दिवसाच्या असल्यामुळे सर्वांनी पवनभाऊ यांना सर्वांनी शुभेच्छा व आशिर्वाद दिले. कोरोना नियमांचे पालन करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.