

पांढरकवडा – २२/१२/२०२०
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक, पांढरकवडा येथे दिनांक २१ डिसेंबर रोजी पार पडली तालुक्यात एकूण सोसायटी चे २२ प्रतिनिधी मतदार होते,
मतदान १००% पार पडले, झालेल्या निवडणुकीत अटीतटीची लढत पहायला मिळणार असे तर्क लावले जात होते.
जेव्हा निवडणूकीचा निकाल लागायला सुरुवात झाली तेव्हा चित्र स्पष्ट झाले की उमेदवार प्रकाश मानकर यांना १३ मते तर त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार शंकर नालमवार यांना ९ मते पडली व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रकाश मानकर यांना विजयी झाल्याचे घोषित केले..
