मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी तालुक्याच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे भव्य वाटप

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


महाराष्ट्र नवनिर्माण सेना,व्यापारी सेना आर्णी तर्फे फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते,पान ठेले,चहा कॅन्टीन इत्यादींना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
मराठी राज भाषा दिनाचे औचित्य साधून व वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता मनसे ने भव्य स्वरूपात मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले.
कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव रोखण्यासाठी मनसेने किरकोळ व्यापाऱ्यांना भेटून कोरोना बाबत जागृती केली.कोरोना चा प्रभाव कशाप्रकारे? रोखता येईल व कोरोनाला कशाप्रकारे?हद्दपार करता येईल,याकरिता मनसेने सोशल डिस्टनसिंग चे महत्व लोकांना समजावून सांगितले.
चिल्लर व्यापारी,पथविक्रेते,फळ विक्रेते,पानपट्टी वाले,चहा वाले इत्यादिंना मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले.
सचिन यलगंधेवार(तालुकाध्यक्ष,मनसे)
संदीप गाडगे(तालुकाध्यक्ष, मनविसे)चंद्रशेखर वानखडे(तालुकाध्यक्ष, व्यापारी सेना)चंदन भगत(तालुका उपाध्यक्ष, मनसे)योगेश राठोड,अनिकेत भगत इत्यादींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी