आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे.
राजकारणात सक्रिय असलेल्या मंडळींनी गावोगावी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे.
कधी काळी अतिशय साध्या पद्धतीने पार पडणाऱ्या ग्रामीण भागातील निवडणुकांना विधानसभेचे स्वरूप आल्याचे दिसत आहे. गावोगावचा सर्व प्रचार हा डिजिटल बॅनर लावून होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी जास्तीत-जास्त ग्रा.पं.वर आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड(शिवसेना),आमदार संदीपभाऊ धुर्वे(भाजप),माजी आमदार ख्वाजा बेग(राष्ट्रवादी),माजी मंत्री शिवाजीराव मोघे(काँग्रेस) आदी प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
त्याबरोबरच सचिन यलगंधेवार(तालुकाध्यक्ष-
मनसे),गणेश हिरोळे(तालुकाध्यक्ष-वंचित आघाडी) यांनी सुद्धा ग्रा. पं. निवडणुका पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढेल अशी,घोषणा केली आहे.
त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी