ट्रक च्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


आर्णी बोरगाव मार्गावरून गावाकडे मोटर सायकल वरून जातांना इसमाचा ट्रक च्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (दि.१२) ला सायंकाळच्या वेळी घडली.
विरेंद्र श्रीरंग जंगम असे मृत व्यक्तीचे नाव आहे.ते आर्णी ला वास्तव्याला होते.काही कारणास्तव आपल्या राहत्या गावी सायंकाळी जात असतांना आर्णी-बोरगाव मार्गावर ट्रक च्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
कारेगाव येथील रहिवासी असलेले विरेंद्र श्रीरंग जंगम हे आर्णी ला वास्तव्याला होते.त्यांच्या आप्त परिवारामध्ये त्यांच्या मागे पत्नी व ०२ मुली आहेत.
ट्रक च्या धडकेत झालेल्या मृत्यू मुळे आसपासच्या परिसरामध्ये मोठी शोक कळा पसरली आहे.
त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर खचला आहे.
या घटनेमुळे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ते चालवीत असलेल्या दुचाकीची अवस्था पाहून धडक किती जबर असेल याची कल्पना येते.